Sunday, April 27, 2025
Homeजळगावजळगावचे पालकमंत्रिपदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटलांच्या गळ्यात !

जळगावचे पालकमंत्रिपदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटलांच्या गळ्यात !

जळगावचे पालकमंत्रिपदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटलांच्या गळ्यात !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या पालकमंत्री पदाची यादी आज जाहीर झाली असून जळगावच्या पालक मंत्री पदाची माळ पुन्हा नामदार गुलाबराव पाटील यांच्यात गळयात पडली आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देखील अद्याप पालकमंत्री पदासाठी रस्सी खेच सुरू होती यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. कारण यावेळी भाजपचे जिल्ह्यात दोन मंत्री झाल्याने त्यांनीही पालकमंत्री पद मिळण्यासाठी अपेक्षा वर्तविल्या होत्या
गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री पदाची धुरा ही गुलाबराव पाटील यांच्याकडे असली तरी आता भारतीय जनता पक्षातर्फे याचा दावा करण्यात आलेला होता हेही सत्य असले तरी गुलाबराव पाटील यांचे मुंबई दरबारी पारडे जड असल्याने त्यांची वर्णी पुन्हा लागल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा निवडीवरून सिद्ध झाले आहे.यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.यामुळे आता पाच वर्षांपेक्षा पुढील कालावधीत देखील गुलाबराव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याची धुरा असेल हे आता स्पष्ट झालेले आहे.दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. तर ना. संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पालकमंत्री पद भूषवले होते. आता या मंत्रिमंडळात त्यांना आधीचेच पाणी पुरवठा व स्वछता हे खाते मिळाले असून सोबत जळगावचेच पालकमंत्री पद मिळायची बाब लक्षणीय मानली जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या