Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाजळगावातील आकाशवाणी चौकात ६३ लाखांची रोकड जप्त !

जळगावातील आकाशवाणी चौकात ६३ लाखांची रोकड जप्त !

जळगावातील आकाशवाणी चौकात ६३ लाखांची रोकड जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील आकाशवाणी चौकात पोलिसांच्या गस्तीदरम्यान एका कारमधून ६३ लाख ६८ हजार ९४८ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
या रोकडसह मुद्देमाल जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आला आहे.गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएम १९ ईए ९१७३ ही कार नाकाबंदीदरम्यान रोखण्यात आली. या कारची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एका पेटीत रोकड आढळून आली. त्यानंतर भरारी पथकाला ही माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या भरारी पथकाने कारमधील राकेश ए. जैन (रा. नयनतारा अपार्टमेंट, सिंधी कॉलनीरोड, जळगाव) यांच्या समक्ष पंचनामा करीत रोकडसह मुद्देमाल जप्त केला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या