Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाजळगावातील एकलव्य क्रीडा संकुलजवळ अपघात : एक जखमी !

जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलजवळ अपघात : एक जखमी !

जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलजवळ अपघात : एक जखमी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भरधाव दुचाकीने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सुनील श्रीश्रीमाळ (रा. सम्राट कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना २७ डिसेंबर रोजी एकलव्य क्रीडा संकुलजवळ घडली आहे.

याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. श्रीश्रीमाळ हे दुचाकीने (एमएच १५ डीजी ७३२०) एकलव्य क्रीडा संकुलाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ जेटी ९३३९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात श्रीश्रीमाळ जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. यश सुनील श्रीश्रीमाळ यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोहेकों प्रशांत पाठक करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या