Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगावातील १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगावातील १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगावातील १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पॅथॉलॉजी लॅबवर कामाला असलेल्या आदित्य संतोष शार्दुल (१९) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता हरिविठ्ठल नगरातील श्यामनगरात घडली आहे.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आदित्य हा आईसोबत श्यामनगरात वास्तव्याला होता. तो एका पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होता. त्याची आईही लॅबवरच कामाला आहे. दोघं वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होते. आई कामावर होती, तर आदित्य हा शुक्रवारी घरीच होता. शेजारील नातेवाईक त्याच्या घरी गेले असता, तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला. त्याच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते, त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास अतुल चौधरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या