जळगावात दुचाकीला ट्रकची जबर धडक : पती, पत्नी जखमी !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना रुग्णालयात दाखल असलेल्या सासऱ्यांना पाहण्यासाठी जात असलेल्या विकास सरिचंद पवार (वय ४४, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे पवार व त्यांची पत्नी जखमी झाले. हा अपघात दि.११ ऑक्टोबर रोजी रेमण्ड चौकात झाला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे विकास पवार हे पत्नी चंद्रकला पवार यांच्यासह दुचाकीने सासऱ्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच २०, जीसी ८३१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात पवार दाम्पत्य बाजूला फेकले जावून जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी पवार यांनी एमआडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक अमोल सुरेश कोळी (रा. मोंढाळे प्र.अ., ता. पारोळा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज पाटील करीत आहेत.