Monday, April 28, 2025
Homeगुन्हाजळगावात पुन्हा एकदा मर्डर; जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपरसह कोयत्याने हल्ला !

जळगावात पुन्हा एकदा मर्डर; जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपरसह कोयत्याने हल्ला !

जळगावात पुन्हा एकदा मर्डर; जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपरसह कोयत्याने हल्ला !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयता, प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली आहे.या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुकेश रमेश शिरसाठ ,वय २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी या हत्यारा व्दारे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय-४५, कोमल निळकंठ शिरसाठ वय-२०, निळकंठ शिरसाठ वय-२५, ललिता निळकंठ शिरसाठ वय-३०, आणि मुकेश रमेश शिरसाठ वय-२६, सनी निळकंठ शिरसाठ वय २१, सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.यातील मुकेश रमेश शिरसाठ वय-२६ या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . मयताचे शव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले असून त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
यावेळी महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली.ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या