Sunday, March 16, 2025
Homeजळगावजळगावात बंद घराला आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक !

जळगावात बंद घराला आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक !

जळगावात बंद घराला आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील राजमालती नगरातील बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात राहणाऱ्या राजू पटेल यांच्या कुलूप बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. घरातून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग आओक्यात आणली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आग विझविण्यासाठी वाहन चालक संतोष तायडे, रोहीदास चौधरी, तेजस जोशी, इकबाल तडवी, महेश पाटील यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या