Thursday, March 27, 2025
Homeहत्याजळगावात महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत निघृण खून !

जळगावात महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत निघृण खून !

जळगावात महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत निघृण खून !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निघृण खून केल्याची घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा आहे. सुवर्णा नवाल पतीसह रणछोड नगरात राहत होत्या. त्यांचे पती हे दाणा बाजारात धान्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजेपूर्वी सुवर्णा नवाल घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. रात्री ८.३० वाजता त्यांचे पती घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळालेली नाही. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या