Sunday, March 16, 2025
Homeजळगावजळगावात १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

जळगावात १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

जळगावात १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आईवडील रुग्णालयात तपासणीसाठी तर आजी शेजाऱ्यांकडे गेलेली असताना घरी एकटा असलेल्या ओम ऊर्फ साई पंडित चव्हाण (१५, रा. गणेश कॉलनी) या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, धक्कादायक घटना सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता समोर आली. आईवडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या विद्यार्थ्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेटचा व्यवसाय असलेले पंडित चव्हाण हे पत्नी, आई, एक मुलगा व एका मुलीसह गणेश कॉलनी परिसरात राहतात. सोमवारी दुपारी ते पत्नीसह खासगी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ओम हा घरी अभ्यास करीत होता. त्याची आजी शेजारच्यांकडे गेल्या व घरी एकटा असलेल्या साई याने गळफास घेतला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्य घरी आले. त्यावेळी दार आतून लावलेले होते. त्यांनी दार ठोठावले; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरडा केली, त्यावेळी शेजारील मंडळी तेथे आली. दार तोडून ओमला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या