Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाजळगावात ३५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगावात ३५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगावात ३५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरातील रहिवासी ३५ वर्षीय तरुण भूषण केशव काकडे यांच्या पोटात पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने या तरुणाचा ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भूषण याच्या पोटात पाणी झाले, त्यामुळे श्वास घेता येत नव्हता. त्याशिवाय पायाला सूज आली होती. नातेवाईकांनी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय च महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर च पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद व करण्यात आली आहे. तपास प्रशांत पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या