Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाजळगाव कारागृहातून बाहेर पडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव कारागृहातून बाहेर पडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव कारागृहातून बाहेर पडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे (वय ३७, रा. असोदा, ता. जळगाव) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, त्याच्यावर एमपीडीअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती.

कारागृहातून बाहेर पडताच नशिराबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.
जळगाव तालुक्यातील असोदा येथील योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. परंतु तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे याचा जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोउनि गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी त्याला दि.१५ ऑक्टोबर रोजी तो कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या