Thursday, March 27, 2025
Homeजळगावजळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिक्षणमंत्र्यांसमोर सादरीकरण

जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिक्षणमंत्र्यांसमोर सादरीकरण

जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिक्षणमंत्र्यांसमोर सादरीकरण

इगतपुरीला राज्यस्तरीय कार्यशाळा : सहा गटात विविध विषयांवर चर्चा

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी- शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण, नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम पद्धतींसाठी धोरणांद्वारे शिक्षण संवर्धन व परिवर्तन करणे, या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पार पडली. शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण डॉ. जगदीश पाटील यांनी पीपीटीद्वारे केले.

राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून शिक्षकांची मते जाणून घेतली. प्रारंभी त्यांच्या सूचनेनुसार उपस्थित शिक्षकांमधून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संचालक आर. विमला, सहाय्यक संचालक सरोज जगताप, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, मंत्रालयातील सहसचिव तुषार महाजन, नाशिक जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी आणि राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे उपक्रमशील व तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होते. राज्यभरातील शिक्षकांचे एकूण सहा गटात सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे म्हणाले की, प्रत्येक विभागवार कार्यशाळा घेऊन शिक्षकांकडून नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याचे एकत्रिकरण केले जात असून संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरतील अशा गोष्टी राबवल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले.

 

सहा गटात सादरीकरण –

सीबीएससीईच्या धर्तीवर अंगणवाडी व बालवाडीचे एकत्रिकरण करणे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि विद्या समीक्षा केंद्राच्या अध्ययन फलनिष्पत्तीत सुधारणा. आदर्श शालेय शिक्षण प्रणाली व आयसीटीचे एकत्रीकरण तसेच शिक्षकांना प्रेरित करण्याचे धोरण. विविध योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास. स्थानिक पातळीवरील शिक्षकांकडून राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, आव्हाने व त्यावरील उपाययोजना. पीएमश्री स्कूल व गुरूकुल शाळा अशा सहा विषयांवर कार्यशाळा पार पडली. त्यातील पाचव्या गटात जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. जगदीश पाटील यांनी जिल्ह्यातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल डॉ. जगदीश पाटील यांचा शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या