Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाजळगाव मनपात खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव मनपात खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव मनपात खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यात प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरे याला रंगेहाथ पकडले.
पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोउनि. सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या