Thursday, March 27, 2025
Homeगुन्हाजळगाव येथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलीसांची धाड

जळगाव येथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलीसांची धाड

जळगाव येथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलीसांची धाड

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर आज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला सिलेंडर व साहित्य जप्त केले आहे .
व भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शोएब शेख शफी याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस विभागा कडून कारवाई म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या