Thursday, March 27, 2025
Homeआत्महत्याजळगाव येथे पत्नी माहेरी असतांना तरुणाचा घरात आढळला मृतदेह !

जळगाव येथे पत्नी माहेरी असतांना तरुणाचा घरात आढळला मृतदेह !

जळगाव येथे पत्नी माहेरी असतांना तरुणाचा घरात आढळला मृतदेह !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -पत्नी मुलांसह माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना कैलास इंदल राठोड (३४, रा. सुप्रीम कॉलनी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मजुरी काम करणारे कैलास राठोड हे पत्नी, आई, मुलगी व दोन मुलांसह सुप्रीम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना ते घरी एकटेच होते. त्यावेळी रविवारी सकाळी कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरवाजा अर्धा उघडा असल्याने शेजारच्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी जवळच राहणाऱ्या तरुणाच्या काकांच्या घरी माहिती दिली. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या