जळगाव येथे महिला पोलिसाला अटक ; तब्बल ३० लाखांचा घातला गंडा
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सर्वसामान्यांची फसवणूक केल्यानंतर आरोपींना अटक झाल्याची बातमी ऐकीवात आहे मात्र जळगावातील महिला कर्मचाऱ्यानेच सहकाऱ्यांची फसवणूक केल्यानंतर या कर्मचाऱ्यास अटक करण्याची वेळ पोलीस दलावर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अर्चना प्रभाकर पाटील असे अटकेतील महिला पोलिसाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दोन महिला पोलिसांना सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा देण्याचे आमिष दाखवून महिला पोलीस अर्चना पाटीलने तब्बल 30 लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी अर्चना पाटील हिच्यासह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
महिला सहाय्य कक्षामध्ये पोलिस शिपाई असलेल्या मंगला सुभाष तायडे (38, रा. पोलिस लाईन, जळगाव) यांनी फिर्याद दिली असून त्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायक कक्षात कार्यरत आहे. 2017 ते जानेवारी 2024 या कालावधीत त्या एमआयडीसी पोलिसात कार्यरत होत्या.
तेव्हा त्यांची ओळख अर्चना पाटील हिच्याशी होऊन मैत्री झाली.अर्चनाने सन 2022 मध्ये मंगलाला एक चांगली योजना आली असून सोन्यात गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा मिळतो मात्र हा व्यवहार विना कागदपत्र होतो. नफ्यामुळे तुझे भले होईल सांगून तिने तिचा विश्वास संपादन केला.
अर्चनाची आई कल्पना प्रभाकर पाटील हिनेही मंगलाला मुलीवर विश्वास ठेवण्यास सांगितले. अखेर फिर्यादी मंगला यांनी 14 जानेवारी 2022 रोजी 70 हजार रूपये दिले. दुसऱ्याच महिन्यात तिला पाच हजारांचा नफा मिळवून दिला.
त्यानंतर फिर्यादी रक्कम वाढवून देत असताना वाढीव मोबदला अर्चना देत गेली त्यामुळे तिच्यावर विश्वास बसला.
दरम्यान, फिर्यादीने अर्चना यांना 20 लाख रुपये दिले. मंगला तायडे यांची मैत्रीण वैशाली गायकवाड (महिला पोलिस शिपाई) यांनीही घर विकून आलेली 10 लाखाची रक्कम अर्चना, तिचा मित्र मिरखाँ नुरखाँ तडवी, बहिणीचा मुलगा विजय रतीलाल पवार यांच्याकडे सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यास दिले होते
मात्र पैसे परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. दरम्यान, अशाच पद्धत्तीने आणखी काहींना गंडवल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे या घटनेने पोलीसा कडून फसवणूक झाल्याने पोलीसाची प्रतिमा मलीन झाली आहे