Sunday, April 27, 2025
Homeजळगावजळगाव सायबर पोलिसांना यश : ६९ लाख रुपयांची रक्कम आणली परत !

जळगाव सायबर पोलिसांना यश : ६९ लाख रुपयांची रक्कम आणली परत !

जळगाव सायबर पोलिसांना यश : ६९ लाख रुपयांची रक्कम आणली परत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ऑनलाइन फसवणुकीतून दोन जणांनी गमावलेल्या १ कोटी २४ लाख रुपयांपैकी ६९ लाख रुपयांची – रक्कम परत आणण्यात जळगाव सायबर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते हे उपस्थित होते. या घटनांपैकी पहिल्या घटनेत जळगाव शहरातील संतकुमार उईके यांना १८ जुलै रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपवरुन एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दिले. त्यात टप्प्याटप्प्यात १ कोटी ६ लाख रुपये नेटबँकींगव्दारे उईके यांनी भरले. मात्र, त्याचा परतावा आला नव्हता. सायबर पोलिसांनी उईकेयांनी ज्या खात्यात रक्कम भरली होती त्याचा पत्ता लावत, १ कोटी ६ लाखांपैकी ५२ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम परत मिळविली. ही रक्कम न्यायालयामार्फत उईके यांना परत देण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत जळगाव शहरातील रहिवाशी राजेंद्र गुलाबराव गरुड यांना १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दोन जणांनी व्हॉटसअॅप वरुन मनी लॉड्रीगमध्ये त्यांचे सीम कार्ड व आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगत त्यांच्यावर मुंबई क्राईम ब्रांचमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे भासविले. त्यानंतर त्यांना मोबाईलवरुनच ‘डीजिटल अरेस्ट’ करुन त्यांच्याकडून १८ लाख रुपयांची रक्कम संबधितांनी घेतली होती. सायबर पोलिसांना जालंधर येथील एका खात्यात ही रक्कम गेल्याची माहिती मिळाली. हे खाते गोठवून त्यातील १७ लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले.

ऑनलाईन फसवणुकीत सायबर पोलिसांनी गेलेली रक्कम परत मिळविण्यात यश मिळाले असले तरी या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. सायबर चोरटे अनेक प्रकारच्या व्हिपीएनचा वापर करत असून, अनेक गुन्हेगार हे परराज्यातील असल्याने त्यांना ओळखणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या