Wednesday, March 26, 2025
Homeजळगावजागतिक महिला दिनाचे औचित साधून यावल तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जागतिक महिला दिनाचे औचित साधून यावल तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जागतिक महिला दिनाचे औचित साधून यावल तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाचे उद्घाटन

यावल दि.८    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूत यावल तहसील कार्यालयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून यावल तहसील कार्यालयामध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजश्रीदीदी यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पुढाकार घेऊन हिरकणी कक्ष सजवून महिलांसाठी सर्व सुविधा त्यात उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी पिण्याचे पाणी,शौचालय व महिलांना सर्व ज्या दैनंदिन सुविधा हव्यात त्या सुविधा महिलांना या हिरकणी कापसाच्या माध्यमातून लाभ घेता येईल. खेड्यापाड्यावरून अनेक महिला तहसील कार्यालयात कामासाठी येतात एखाद्या वेळी त्यांना थकवा जाणवला किंवा उन्हाळा पावसाळा यात काही अडचणी असल्यास या ठिकाणी दुपारच्या वेळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत त्याचा उपयोग घेता येईल यावेळी शहरातील लाडक्या बहिणी व महसूल प्रशासनातील तलाठी वर्ग उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तहसील कार्यालयाचे सर्व स्टाफने परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या