जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने संकल्प करूया निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे रक्षण करूया ,पर्यावरणाचा समतोल राखुया.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी डॉ. सुरेंद्र सिंग पाटील यांचे प्रतिपादन
3. मार्च जागतिक वन्यजीव दिवस संयुक्त राष्ट्र संघाने 2013 पासून वन्यजीवांचे रक्षण करण्या साठी हा दिवस सुरू केलेला आहे.
आपल्या देशात सन 1957 पासून 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर पर्यंत निसर्गनिर्मित वनस्पती व जीवांचे संरक्षण संवर्धन यासाठी सप्ताह साजरा केला जातो मानवाचे अस्तित्व निसर्गनिर्मित सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे
वन्य जीवांचे संरक्षण, संवर्धन हे पर्यावरणाशी जुळलेले आहे. वन्य जीवांचे संरक्षण हे प्राकृतिक संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत मानवाने पर्यावरण दृष्टीने आपणास व सर्व सजीवांना आवश्यक असलेल्या निसर्गनिर्मित असलेल्या सर्व ठिकाणी छेडछाड मोठ्या प्रमाणावर करत सर्व प्रकारच्या मानवजातीसहित सर्व सजीवांचे जीवन धोक्यात आणलेले आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडलेला आहे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध प्राण्यांची शिकार होत आहे. पानवट्यामध्ये पाणी राहत नाही. त्यामुळे अनेक जीव पाण्यामुळे मरण पावत आहे आहे मानव त्यांचा अधिवास संपवत असल्यामुळे अनेक प्राणी नष्ट होत आहे हा निसर्ग सर्वांचा आहे याचा विसर मानव जातीला पडलेला आहेत् जंगलात असलेल्या निसर्गनिर्मित अनेक वनस्पती नष्ट होत आहे यामुळे आपणास अनेक संकटास तोंड द्यावे लागत आहे जंगलात राहणारे प्राणी गावात येऊन मानवावर हल्ले करत आहेत . आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने आपला जन्म निसर्गनिर्मित भूमीवर झाला ज्यामुळे आपले अस्तित्व सुरक्षित आहे त्या भूमीची छेडछाड मोठ्या प्रमाणात मानव जातीकडून अनावधानाने आपणाकडून झालेले आहे जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने झालं गेलं विसरून भूमातेची माफी मागून आपण सर्वजण संकल्प करूया या निसर्गाचे संरक्षण संवर्धन संगोपन करूया व आपली निसर्गा विषयी असलेली जबाबदारी पार पाडूया पर्यावरणाचे संतुलन राखूया असे पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग पाटील यांनी सांगितले आहे .