Wednesday, March 26, 2025
Homeजळगावजामनेरात कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या !

जामनेरात कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या !

जामनेरात कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या !

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील पहूर येथे कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लॉध्री बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. भागवत हे शुक्रवारी संध्याकाळी घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्री स्वतःच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. जीवन यांच्यावर खासगी व बँकेचे सत्तर ते ऐंशी हजाराचे कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्याचे व्याज वाढल्याने ते विवंचनेत होते. या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या