Sunday, April 27, 2025
Homeजळगावजामनेर येथील पत्रकार अनिल शिरसाठ यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार प्रदान.

जामनेर येथील पत्रकार अनिल शिरसाठ यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार प्रदान.

जामनेर येथील पत्रकार अनिल शिरसाठ यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार प्रदान.

जामनेर दि.९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तहसिलदार व पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,रेल्वे ग्रामीण ठाणेदार, प्रतिष्ठित नागरिक उद्योजक जेष्ठ पत्रकार वीर पत्नी यांच्या हस्ते जामनेर येथील पत्रकार अनिल शिरसाठ यांना दि.६ जानेवारी २०२५ रोजी पुरस्कार देण्यात आला.
समाजातील सत्य शोधुन निपक्ष व निर्भिडपणे सजगपणे जनतेसमोर मांडण्याचा वसा घेऊन पत्रकारकारीतेच्या माध्यमातून ठसा उमटविणार्‍या तसेच शासकीय योजनांच्या प्रगतीची राज्याच्या विकासाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विविध विकास योजना त्यांची अंमलबजावणी या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनते पर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भुमिका महत्त्वाची आहे.हि भुमिका जबाबदारी पार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन मान्यता देणे आवश्यक आहे. विकासविषयक उत्कृष्ट बातम्या वार्तापत्रे स्फुट लेखन करणार्‍या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देणे म्हणजे त्यांचा योग्य सन्मान व पत्रकारीका क्षेत्रात उल्लेखनीय तसेच लक्षणीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना त्याच प्रमाणे समाज माध्यम आणि स्वच्छता

 

Oplus_131072

अभियानाबाबत केलेल्या जनजागरण व जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्काराने गौरविण्यात येणे म्हणजे त्यांचा योग्य सन्मान करणे.६ जानेवारी पत्रकार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवशी मराठी पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जातो.या दिवसाचेऔचित्य साधून
मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील लेवा नवयुवक मंडळाच्या प्रशस्त सभागृहात राज्यस्तरीय पत्रकार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या वर्गाचा नियोजित कार्यक्रमात
जामनेर येथील निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील इंगळे, सागर लव्हाळे, मोहन दुबे, मनोज महाले, शांताराम झाल्टे, या पत्रकार बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी तहसिलदार पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच उद्योगपती प्रतिष्ठीत नागरीक वीर पत्नी जेष्ठ पत्रकार यांच्या हस्ते जामनेर येथील पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार अनिल शिरसाठ यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या