Tuesday, April 29, 2025
Homeजळगावजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यपाल यांच्याकडे गुप्ता यांनी...

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यपाल यांच्याकडे गुप्ता यांनी केली तक्रार.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यपाल यांच्याकडे गुप्ता यांनी केली तक्रार!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव जिल्ह्यातील इतर काही भ्रष्ट अधिकारी यांच्यापासून खोट्या पोलीस केस मध्ये अटकावण्याचा धोका असले बाबतची लेखी तक्रार ई-मेल द्वारा जळगाव येथील दीपक कुमार गुप्ता यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे केली.दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी ईमेल द्वारा केलेल्या लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,मी दीपककुमार पी.गुप्ता, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता, रा. ३८८,घरकुल, शिवाजीनगर, जलगांव जिल्हा जलगांव विनंतीपूर्वक तक्रारी अर्ज करतो कि, मला सामाजीक कार्याची आवड असल्यामुळे मी महाराष्ट्र शासन यांची संस्था यशदा पुणे मधुन माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेतले आहे करीता माझ्याकडे नेहमी सामान्य जनता हि त्यांचे शासकीय काम अथवा त्यांची तक्रारीची दखल न घेतली गेल्याने तक्रार अर्ज करीत असतात त्या तक्रारी अर्जाची शहानिशा करण्याकरीता मी माहिती अधिकारातुन संबधीत शासकीय कार्यालयातुन माहिती घेवून तक्रार खोटी आहे किंवा खरी याबाबत शाहानिशा करुन तक्रार खरी असल्यास संबंधीत विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांना तक्रारीची चौकशी करण्याबाबत विनंती करुन सामान्य माणसाला न्याय मिळावायाकरीता पाठपुरावा करीत असतो. माहिती अधिकार टाकल्यानंतर शासकीय कार्यालयातून माहिती मिळाल्यावर अनेकदा असे लक्षात येते कि,संबंधित शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार/ गैरप्रकार/ गैरव्यवहार झालेला आहे. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे मी त्यांचे वरिष्ठ अधिकारी/कार्यालयात भ्रष्टाचार/ गैरप्रकार/ गैरव्यवहार थांबवण्यासाठी तक्रार करून पाठपुरावा करीत असतो. त्यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकारी माझ्या तक्रार मुळे दुखावले जातात.तसेच सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने अनेकदा अवैध वाळू वाहतूक थांबवणे करिता जनतेतून तोंडी /लेखी किंवा सोशल मिडिया द्वारे तक्रार प्राप्त होत असतात.मी त्या तक्रारीची दखल घेवून संबंधित् महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांना त्या तक्रारीची दखल घेणेसाठी पाठपुरावा करीत असतो.माझे पाठपुरावामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दखल घ्यावी लागून अवैध वाळू माफिया यांचेवर कारवाई देखील करावी लागते.त्या वाळू माफियांवर गुन्हे दाखल होवून अनेकींना आर्थिक देंड झालेला आहे आतापर्यंत जवळपास माझे त्यामुळे ते पण माझ्याकडून नाइलाजाने दुखावले गेले आहेत…सार्वजनीक हिताच्या आणि शासनाचा पैशयांचा अपवय टाळण्याच्या दृष्टिने शासकीय कार्यालयामध्ये होणारा भ्रष्टाचार, गैरप्रकार व्हिसलब्लोअर म्हणून उघडकीस आणत असुन मी माहिती अधिकार कार्यकर्ता आणि प्रशिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कामकाज पाहत आहे. आज पर्यंत मी केलेल्या कामाची दखल ही शासनाने वेळोवेळी घेतलेली असुन त्याबाबत माझा गौरव आणि प्रशिस्त पत्र देवून माझा सम्मान ही करण्यातआलेला आहे.
सदरहू पत्रादवारे मी वर विषयास संदर्भात मला काही लोकांकडून / शासकीय कर्मचारी यांचेकडून समोर न येण्याचे अटीवर व कुठलाही कोठेही आपले स्टेटमेंट न देण्याचे अटीवर तोंडी उपलब्ध झालेल्या माहितीवरुन तक्रार दाखल करत आहे कि,जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद व जळगाव जिल्ह्यातील इतर काही भ्रष्ट अधिकारी हे आपसात बेकायदेशीर संगनमत करून मला ऐन-केन प्रकरणी कुठल्याही खालचे स्तरावर जावून जान -माल धोका करून खोटे पोलीस केस मध्ये अटकावनेच्या प्रयत्नात आहे. याचे कारण असे आहे कि, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अनेक बेकायदेशीर व नियमबाह्य कार्य तसेच त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाबत मी शासनाचे वरिष्ठ स्तर जसे मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र शासन, पंतप्रधान कार्यालय,विभागीय आयुक्त नाशिक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाकडे तक्रार केलेली आहे. त्याचा वचपा काढणेसाठी ते जळगाव जिल्ह्यातील इतर काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट
दलाल यांचे सोबत संगनमत करून मला फसविण्याचे प्रयत्नात आहे.जळगाव तहसील कार्यालय यांनी माझे माहिती अधिकारचे अर्जाचे उत्तर देताना जवळपास दीड ते दोन वर्षापूर्वी मला अशी माहिती दिली आहे कि,अवैध वाळू वाहतूक/साठा व उत्खनन बाबत मी केलेले तक्रारीवर जवळपास चाळीस कोटी रुपयाचे दंड झालेले आहे. या अर्जाची चौकशी दरम्यान आपण मागणी केल्यास सदरची माहितीअधिकारचे अर्जाचे उत्तरची प्रत आपल्याला देण्यास तयार आहे.
तसेच अवैध वाळू साठा प्रकरणी भुसावळ तालुक्यातील माझे तक्रारीवर अवैध वाळू साठा केल्याने अनेक लोकांना एकूण मिळून पाच ते सात कोटी दंडाची नोटीस भुसावळ तहसीलदार यांनी दिलेली आहे. व या प्रकरणी भुसावळ तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना आपले कर्तव्यात हयगय केल्यामुळे व भ्रष्टाचार केल्याचे माझे तक्रारीवर तत्कालीन जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. तत्कालीन जळगाव तहसीलदार श्रीमती वैशाली हिंगे यांनी केलेल्या भ्रष्टाचारची तक्रार व पाठपुरावा
केल्यामुळे त्यांची दोन कार्यालयीन चौकशी सुरु झाली होती. त्याचा राग मनात धरून वाळू माफिया यांचेशी बेकायदेशीर संगनमत खोटे पोलीस केस मध्ये अटकावले होते. त्याचा न्यालयाने निकालाअंती माझे दोषी असल्याचा कोणताही पुरावा न सापडल्याने मा.जळगाव न्यायालयकडून मला निर्दोष सोडण्यात आलेले आहे.जवळपास दोन ते अडीच वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्याचे तहसीलदार कार्यालायचे अंतर्गत पूर्वीचे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील धुळे जिल्ह्यातील फागणे ते जळगाव जिल्ह्यातील तरसोद पर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणचे काम करण्याचे ठेकेदार जांडू कन्स्ट्रक्शन कम्पनी,हिस्सार रा. हिस्सार यांनी मौजे पाळधी
बु.ता.धरणगांव येथील गट नं. 229 /2 मधील अवैध मुरूम उत्खनन केल्याबाबत जवळपास अठरा कोटी रुपये दंड धरणगाव
तालुक्याचे तहसीलदार यांनी केलेला आहे. व पुढे गौणखनिज अपील क्र.३६/२०२४ या अपिलात मा.उपविभागीय अधिकारी एरंडोल विभाग एरंडोल यांचे न्यायालय यांनी दिनांक २०/०९/२०२४ रोजी १९१९० ब्रास अवैध मुरूम उत्खनन केल्यामुळे सतरा कोटी एक्यांशी लाख बयान्नौ हजार ऐंशी रुपये मात्र धरणगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी केलेला दंड कायम ठेवलेला आहे. तसेच त्याच कालावधीत मी केलेले एका तक्रारीवर इतर व्यक्तींना जवळपास आठ कोटी दंडाची नोटीस निघाली होती.
२०२१ साली जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्याचे शासकीय रेशन दुकानदार जे गोरगरीब जनताचे हक्काचा शासनकडून येणारा अनाज भ्रष्टाचार करून खाऊन जात होते जनतेची तक्रार सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माझेकडे आलेवर मी केलेली एका तक्रारीवर १४३ शासकीय रेशन दुकानदाराना एकाचवेळी दंड होवून त्यांची अनामत रक्कम जमा करण्यात आली होती व आहे.या तक्रारीचा फायदा लाभार्थी गोरगरीब जनतेला असा झाला कि,अनेक शासकीय रेशन दुकानदारकडून वेळेवर व पूर्ण अनाज मिळू लागले.आतापर्यंत
माझे तक्रारीवर अवैध वाळू वाहतूक / साठा व उत्खनन बाबत अनेक कोटीचा शासनाला महसूल मिळालेला आहे. याबाबत माझे तक्रारीवर अनेक भ्रष्ट अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस,विभागीय चौकशीला सामोरे जावे लागलेले आहे.त्याचा राग आजपण आहे.व ते या गोष्टीमुळे वचपा काढण्याचे फिर्याक मध्ये राहत आहे.हल्लीचे कालावधीत जळगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे गैरकारभार व भ्रष्टाचाराची मी तक्रार केल्यामुळे तेपण जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे सोबत संगनमत करून मला ऐन-केन प्रकरणी कुठल्याही खालचे स्तरावर जावून जान -माल धोका करून खोटे पोलीस केस मध्ये अटकावनेच्या प्रयत्नात आहे असा मला संशय आहे.
अनेक प्रकरणी मला सामाजिक कार्यकर्ता होण्याचे नात्याने जनतेकडून तक्रार प्राप्त होते कि, अनेक शासकीय कार्यालय कडून त्यांचे संबंधी त्यांचे कायदेशीर काम होत नसल्याने आपण ( दीपककुमार गुप्ता ) पाठपुरावा करणेकामी व त्यांना न्याय मिळून देणेकामी त्यांची मदत करावी या कामासाठी मला अनेकदा अनेक शासकीय कार्यालात जावे लागते व काम वेळेवर होत नसेल तर त्याचा वरिष्ठ अधिकारी कडे पाठपुरावा करावे लागते व वेळप्रसंगी कायदेशीर काम होत नसेल तर नाईलाजाने तक्रारही करावी लागते त्याचा फायदा असा होते कि,नागरिकांचे कायदेशीर काम लवकर होवून जाते. नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ता होण्याचे नात्याने माझेकडे केलेली अनेक लेखी तक्रारची प्रत माझेकडे आजपण आहे.या अर्जाची चौकशी दरम्यान आपण मागणी केल्यास सदरची अर्जाची प्रत आपल्याला देण्यास मी तयार आहे.
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पोलिस दलमध्ये नागरिकांचे सुरक्षासाठी पोलिस कर्मचारी व जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या यांचा विचार केला असता सरासरी चार हजार नागरिकांचे सुरक्षासाठी एक पोलिस कर्मचारी आहे व जळगाव जिल्ह्यात नागरिकांचे सुरक्षासाठी पोलिसांची कमतरता आहे असे असताना व जे उपलब्ध पोलिस कर्मचारी आहे त्यापैकी अनेक कर्मचारी त्यांचे हक्काचे सुट्टी / वैद्यकीय रजा / होळी, दिवाळी, ईद असे वर्षभर चालणारे बंदोबस्त वैगेरे मध्ये व्यस्त असतात बेकायदेशीर व फक्त पदाचा रुतबा दाखवणेसाठी पोलिस प्रोटेक्शन देणे व घेणेचा चुकीचा परीपाठी / पायंडा निर्माण होत असल्याने मागील दोन महिने पूर्वी मी केलेली तक्रारीनंतर माझी तक्रार मध्ये सत्य आढळून आल्याने जळगावचे मनपा आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे व जळगाव जिल्हाचे सरकारी वकील श्री सुरेन्द्र काबरा यांना दिलेले बेकायदेशीर व फक्त पदाचा रुतबा दाखवणेसाठी पोलिस प्रोटेक्शन जळगाव पोलिसांकडून काढून घेण्यात आलेला आहे. माझी या तक्रारीचा फायदा जळगाव पोलिस दलास असे झाले आहे कि,त्यांना खरी पोलिसिंग करणेसाठी चार पोलीस कर्मचारी मिळाले आहे. याच प्रमाणे माजी विधानपरिषद आमदार श्री गुरुमुख जगवाणी यांच्या विधानपरिषद आमदारचा कार्यकाल संपून अनेक वर्ष झाले असूनही त्यांना बेकायदेशीर पोलिस प्रोटेक्शन देणे सुरु होता ताझे तक्रारीमुळे त्यांचे पोलिस प्रोटेक्शन काढलेले आहे.
यापूर्वी मला अनेकदा जीवे मारण्याचे व खोटे गुन्ह्यात अटकावनेची धमकी दिली आहे त्याची मी पोलिसात
वेळोवेळी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. तरी या अर्जाची चौकशी दरम्यान आपण मागणी केल्यास सदरची अदखलपात्र
गुन्हाची प्रत आपल्याला देण्यास मी तयार आहे. तसेच सन २०२० मध्ये माझेवर वाळू माफिया यांनी मला घेरून धमकी दिली जानमालची धमकी दिली होती मी त्याची तक्रार शासन / प्रशसान कडे केली त्यानंतर त्वरित दि.२६ जून २०२० पासून जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनकडून मला निशुल्क चोवीस तास पोलीस प्रोटेक्शन दिलेले आहे. माझी जनहितार्थ केलेले रास्त तक्रारी, पाठपुरावा, आंदोलन यांची दखल शासन / प्रशसान व न्यायालय
यांनी घेतल्यामुळे अनेक शासकीय भ्रष्ट अधिकारी/ कर्मचारी/ शासकीय कामात गैरप्रकार करणारे ठेकेदार/रेशन माफिया दुखावले गेले असल्याने ते माझा काटा काढनेचे फिर्याक मध्ये राहत असते व प्रशसानचे काही भ्रष्ट अधिकारी
शहरात कोणी सामाजिक काम करू नये व भ्रष्टाचारची विरोध करू नये यासाठी जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष
प्रसाद, जळगावचे उप विभागीय महसूल अधिकारी श्री विनय गोसावी, जळगाव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एम.पी मगर, व जिल्हा उप अधीक्षक भूमी अभिलेख जामनेर ता. जामनेर श्रीमती शीतल लेकुरवाडे- सावळे व जळगाव जिल्ह्यातील इतर काही भ्रष्ट अधिकारी हे आपसात बेकायदेशीर संगनमत करून मला ऐन-केन प्रकरणी कुठल्याही खालचे स्तरावर जावून जानमाल धोका करून खोटे पोलीस केस मध्ये अटकावनेच्या प्रयत्नात आहे व प्रशसानचे काही भ्रष्ट अधिकारी माझे विरूद्ध पोलिसातअदखलपात्र खोटे गुन्हाची नोंद करून मी गुन्हेगार असल्याचा खोटा पुरावा तयार करून माझा पोलीस प्रोटेक्शन काढण्याचा प्रयत्नात आहे कारण माझेकडे पोलीस
प्रोटेक्शन असल्याने ते त्यांचे हस्तगत मार्फत माझेवर हमला करू शकत नाहीत किंवा मला खंडणी मागणीचे खोटे गुन्हात
किंवा एखादी स्त्रीचे विनयभंग करण्याचे खोटे गुन्हयात किंवा मारामारी केल्याचे धमकी दिलेचे खोटे गुन्हायात अडकवू शकत नाहीत. व माझे पोलीस प्रोटेक्शन निघालेनंतर खाजगी गुंडांना लावून माझे जानमालला धोका पोहचवू
शकतात.
अशाप्रकारे पुराव्यासह वस्तुस्थिती मांडून दीपक कुमार गुप्ता यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार करून जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्ह्यातील इतर काही भ्रष्ट अधिकारी खोट्या तक्रारी करून गुन्हे दाखल करून मला सर्व प्रकारे धोका पोहोचवू शकतात

तरी महोदय माझी आपल्याला नम्र विनंती आहे की,

१) या वरील गोष्टीची नोंद आपल्याकडे करून जळगावचे वर्तमान जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचेवर योग्यती कायदेशीर
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.

२) आज किंवा भविष्यात माझे जिवितास काही बरे वाईट झाले किवा माझी हत्या झालीतर त्यासाठी जळगावचे वर्तमान जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांना जबाबदार धरण्यात येवून त्यांचेवर पुढची योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या गोष्टीची नोंद आपल्याकडे करण्यात यावी.

३) या वरील गोष्टीची नोंद आपल्याकडे करून माझेविरूद्ध आलेली प्रशासन किंवा अन्य व्यक्तीकडून पोलीस दलाकडे आलेली तक्रारीवर कोणतीही कारवाई करणे किवा पोलिसात अदखलपात्र / दखलपात्र गुन्हाची नोंद करणे पूर्वी नैसर्गिक न्याय तत्वाचे आधारावर मला माझे म्हणणे मांडणेची संधी द्यावी असे आदेश देण्यात यावे. तसेज वरील प्रकारणात तत्काळ योग्य ते कायदेशीर कार्यवाई करून केलेल्या अंतिम कार्यवाहीची एक प्रत मला देण्यात यावी.ही पण नम्र विनंती.

अशी तक्रार केली असली तरी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय या तक्रारीची काय दखल घेतात..? याकडे दीपक कुमार गुप्ता यांच्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या