Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाजिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच ; अभोडा येथे चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन

जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच ; अभोडा येथे चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन

जिल्ह्यात खूनाची मालिका सुरूच ; अभोडा येथे चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात खुनाची मालीका सुरूच असुन पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे.

या घटनेत पत्नीचा खून करून पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.आशा संतोष तायडे (वय ३८ रा. आभोडा ता. रावेर) अशा मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील आभोडा या गावात आशा तायडे या महिला आपल्या परिवारासह राहत होत्या.शेती व मजुरीचे काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.दरम्यान त्यांचे पती संतोष तायडे याने गळा दाबून पत्नीचा खून केला.ही घटना सोमवारी ३१ मार्चची सकाळी ६ वाजता समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.या दुदैवी घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना असल्याचे बोलले जात आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या