Monday, March 17, 2025
Homeगुन्हाजिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त... भुसावळसह रावेरातील एकाला अटक...

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त… भुसावळसह रावेरातील एकाला अटक !

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त… भुसावळसह रावेरातील एकाला अटक !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहराच्या वेगवेगळ्या भागात भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत एकत्रित ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती पुरावा देऊ न शकल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू असताना सायंकाळी काळ्या बॅगमधून एक व्यक्ती रोकड घेऊन जात असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळताच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी केली. आचारसंहिता कक्षातील भरारी पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ वाजता संशयित सुनील लखीचंद लुल्लव्य (रा. ४६२, आदर्शनगर, भुसावळ) यांची झडती घेतली असता, काळ्या रंगाच्या बॅगेत ८५ हजार २३० रुपयांची रोख रक्कम मिळाली. याचा पंचनामा करण्यात आला.
या कारवाईच्या दहा मिनिटांनी शहरातील व्यापारी राहुल सुनील खटवाणी (रा. रावेर) यांच्याकडे १ लाख ९० हजार ७०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली. या दोन कारवाईत मिळून एकूण २ लाख ७५ हजार ९३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या