Monday, March 24, 2025
Homeगुन्हाजुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणीला घरात घुसून मारहाण !

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणीला घरात घुसून मारहाण !

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणीला घरात घुसून मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणीच्या घरात येवून शिवीगाळ करत मारहाण केली तर घरातील खिडकीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात विद्या शंकर सोनवणे (वय २१)  ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून याच परिसरात राहणारे लक्ष्मी उर्फ चिमणी, कोमल शिरसाठ, उज्ज्वला शिरसाठ, पुजा शिरसाठ यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरातील खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी विद्या सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मी उर्फ चिमणी, कोमल शिरसाठ, उज्ज्वला शिरसाठ, पुजा शिरसाठ सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सत्यवान वारंगे हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या