जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मागील भांडणाऱ्या कारणावरून रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर तीन जणांनी धारदार वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ मार्च रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत रितेश शिंदे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १२ रोजी तो रामेश्वर कॉलनीतील एका टपरीजवळ उभा असताना तिथे रितीक, मॉडल व बिल्डर (तिघांचेही पूर्ण नाव समजू शकले नाही) हे तेथे आले. मागील भांडणाच्या कारणावरून तिघांनी तरुणाच्या उजव्या डोळ्याजवळ, पाठीवर, डोक्यावर धारदार वस्तूने वार करून जखमी केले.
तसेच परत भेटला तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी रितेश शिंदे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.