जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सोलो डान्स स्पर्धा.
यावल दि.२६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथे मंगळवार दि० २५ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली.
हा कार्यक्रम शरददादा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम व दिपाली धांडे मॅडम तसेच पी.एस. सोनवणे सर l.T.I चे प्राचार्य गिरीष वाघुळदे सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शरददादा महाजन, पि.एस.सोनवणे व इतर उपस्थित मान्यवरांनी गणेश पूजन व दीप्रज्वलन करून केली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत सादर करून केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता ६ वी व ७ वी सेमीच्या विद्यार्थिनी सुरेख स्वागत गीत सादर केले.शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
तसेच कीरीओग्राफर सचिन भिडे सर,सुरज भालेराव सर व प्रतिक कोळी यांनी उपस्थिती दिली.सोलो डान्स कसा प्रभावी व उत्तमरीत्या सादर करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना केले.
पी एस सोनवणे सरांचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शरददादा महाजन यांनी आपली संस्कृती व संस्कार कसे जपावे व आपला भारत देशातील संस्कार, संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या हातून टिकवावी अशी आशा व्यक्त केली. तसेच दादांनी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.गोरी भिरूड मॅडम व श्रीमती लोखंडे मॅडम यांनी केले.कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले नृत्य कौशल्य उत्तमरित्या सादर केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मुलांचा मोठा उत्साह दिसून आला.
या कार्यक्रमाच्या रूपरेषा आखण्यासाठी पर्यवेक्षिका सौ.गौरी भिरुड मॅडम व पर्यवेक्षिका श्रीमती लोखंडे मॅडम यांचे मार्गदर्शन मार्गदर्शन लाभले.
आभार प्रदर्शन सौ.सरोज येवले मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.अशा रीतीने सोलो डान्स स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला.