जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने केला नरेंद्र नारखेडे यांचा सन्मान
फैजपूर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह
येथील यावल शेतकी संघाचे चेअरमन व क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांचा नुकताच आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्यात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थने शाल, श्रीफळ व जोग महाराज चरित्र ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज शिंदे हसेगावकर यांचे शुभ हस्ते झाला तर याप्रसंगी श्रीसंत निवृत्ती महाराज समाधी मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष कोल्हे महाराज, नथुसिंग बाबा समाधी मंदिर अध्यक्ष संजय सिंग महाराज व गंजीधर महाराज भोकरदनकर विश्वस्थ मंडळ पदमसिह पाटील, जी प सदस्य व किर्तनकार मंडळी, वारकरी उपस्थित होते. विविध पदावर व विशेषतः क ब चौ विद्यापीठ सिनेट सदस्य व सहकार भारती जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बदल व संत विचार प्रसार कार्याबद्दल श्री नारखेडे यांचा सन्मान करण्यात आला.