Wednesday, March 26, 2025
Homeकृषीज्वारी खरेदी नोंदणीसाठी शेतकरी स्वतः लागेल आणि मोबाईल नं. आधार कार्डशी अपडेट...

ज्वारी खरेदी नोंदणीसाठी शेतकरी स्वतः लागेल आणि मोबाईल नं. आधार कार्डशी अपडेट पाहिजे हा तुघलकी निर्णय त्वरित रद्द करावा.

ज्वारी खरेदी नोंदणीसाठी शेतकरी स्वतः लागेल आणि मोबाईल नं. आधार कार्डशी अपडेट पाहिजे हा तुघलकी निर्णय त्वरित रद्द करावा.

उपाध्यक्ष : प्रशांत चौधरी.

यावल तालुक्यात ज्वारी खरेदी नोंदणी आजपासून सुरू

यावल दि.१  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यात ते सुद्धा ग्रामीण भागातील कोरपावली येथे सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ पासून आधारभूत ज्वारी खरेदी केंद्र सुरू होत आहे परंतु ज्वारी खरेदी नोंदणीसाठी सोसायटी मार्फत तथा शासनामार्फत संबंधित शेतकरी स्वतः लागेल तसेच त्याच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा असे तुघलकी निर्णय घेतल्याने वयोवृद्ध शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होऊन कमालीचा त्रास होणार आहे आणि ज्वारी खरेदी नोंदणीसाठी लाईन मध्ये उभे राहावे लागणार असल्याने शासनाने तथा कोरपावली विका सोसायटीने हा तूघलकी निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषक समाजाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत चौधरी यांनी मागणी केली आहे.

यावल तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप ) हंगाम भरडधान्य (ज्वारी, मका,)
खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात.
२०२४-२५ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप ) हंगाम भरडधान्य ( ज्वारी, मका ) खरेदी केंद्र यावल,उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी २ डिसेंबर २०२४ सुरू होत आहे .
शासकीय हमीभाव ज्वारी :- ३३७१ रू. मका :-२२२५ रू. प्रतिक्विंटल प्रमाणे आहे,शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स,पिकाचा ऑनलाईन चालु २०२४-२०२५खरीप हंगामाचा (ज्वारी / मका ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला . *ऑनलाईन नोंदणीकरीता शेतकरऱ्याचा प्रत्यक्ष LIVE फोटो अपलोड करणे आवश्यक आहे*.त्याशिवाय नोंदणी पुर्ण होत नाही. नोंदणी साठी त्वरीत संस्थेशी संपर्क करावा.

शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी,तसेच बॅक अकाऊंट चालू स्तीतीत तसेच पुर्ण अकी असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते .
टीप :- ( नोंदणी अंतीम दि.१५ डिसेंबर २०२४ पर्यंत )
नोंदणी ठीकाण :- कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी.लि.कोरपावली.ता.यावल
येथे आहे.

शेतकऱ्यांचा सातबाराचा उतारा हाच मोठा पुरावा असताना शेतकरी स्वतः हजर कशासाठी पाहिजे, तसेच आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा हे तूघलती निर्णय शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीत आणणारे असून अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत आता कोरपावली येथे जाऊन विविध कार्यकारी सोसायटी समोर लाईन मध्ये उभे राहून ज्वारी खरेदी नोंदणी करायची का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कोरपावली विकास सोसायटीने तात्काळ घ्यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषक समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत चौधरी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या