Monday, March 17, 2025
Homeगुन्हाझोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक!

झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक!

झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक!

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागे असणाऱ्या झोपडपट्टी भागात दि.१४ रोजी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दि.१४ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टी भागात सापळा लावला. त्यात जयेश प्रदीप सपकाळ (वय २६, रा दोंडकेवाडा निंभोरा, ता. रावेर) याच्य ताब्यातून एक गावठी बनावटीची पिस्तूल (कट्टा), एक जिवंत काडतूस मिळून आली. सोबत दुचाकी वाहन असा एकूण १ लाख १ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध शहर पोलिसात गुर.न ४५९ / २४ आर्म अॅक्ट अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एकनाथ भिसे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या