ट्रॅक्टर चालकाचा कहर : १२ दुचाकीना उडविले !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील वाकी रोडवरील पोस्ट ऑफिससमोर लावलेल्या जवळपास १० दुचाकींना तेथून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टने जबर धडक दिल्याने सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नसून ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जामनेर शहरातून वाकी रोडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जवळपास १० दुचाकींना जबर धडक दिल्याने दुकाकींचे नुकसान झाले असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना २८ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोस्ट ऑफीस कार्यालयासमोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता. परंतु, पोलिसांनी वेळेवर येऊन परिस्थिती लक्षात घेत खोळबंलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, जामनेर शहरातील वाकी रोडवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफिस हे दोघे कार्यालय शेजारी शेजारीच आहेत. या दोन्ही कार्यालयांच्या समोर त्यांच्या ग्राहकांना वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आपली वाहन नाईलाजाने रस्त्याच्या कडेला लावावी लागतात. तर मेन रस्ता ही अरूंद असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतूकीची कोंडी होत असते.
तर अनेक छोटे-मोठे अपघात घडतच असतात. त्यामुळे येथे वाहन लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच रस्त्यावरील वर्दळ पाहता मुख्य रस्त्याची रुंदी ही वाढवावी, अशी मागणी यानिमित्त ग्राहकांकडून करण्यात येत आहे.