डॉ नरेंद्र महाले यांच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.
यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तहसील कार्यालया तर्फे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांचा ११ रावेर विधानसभा मतदान क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधन केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार शैलेश तरसोदे,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,गांगुर्डे साहेब यांची उपस्थिती होती.११ रावेर विधानसभा मतदान क्षेत्रांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये डॉ. नरेंद्र महाले यांनी मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली यात त्यांनी भारुड,पथनाट्य कीर्तन, विविध व्यवसाय करत असणाऱ्या व्यवसायिकांच्या भूमिका बजावून त्या संदर्भात व्हिडिओ तयार करून अशा प्रकारचे व्हिडिओ विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवले.इंस्टाग्राम, यू ट्यूब,फेसबुक यासारख्या प्रसार माध्यमांवरती मतदारांमध्ये जनजागृती करून प्रबोधनाचे राष्ट्रीय कार्य केल्याबद्दल डॉ.नरेंद्र महाले यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.