Wednesday, March 26, 2025
Homeजळगावडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यावल शहरातून १४२ क्विंटल घाण कचऱ्याची केली साफसफाई.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यावल शहरातून १४२ क्विंटल घाण कचऱ्याची केली साफसफाई.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यावल शहरातून १४२ क्विंटल घाण कचऱ्याची केली साफसफाई.

यावल दि.५   खानदेश लाईव्ह न्युज   प्रतिनिधी.    डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यावल शहरात स्वच्छता अभियान राबवून शहरातून १४२.७५ क्विंटल घाण कचऱ्याची साफसफाई केली.
स्वच्छता दूत परम श्री सन्मानित महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप माननीय डॉ. श्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी व आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त यावल शहरातील शासकीय कार्यालय व प्रमुख रस्त्यावर अंदाजे २५० ते २६० श्री सदस्यांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबवून या स्वच्छता अभियानात सुका कचरा १०३.३० क्विंटल आणि ओला कचरा ४१.४५ क्विंटल असा एकूण एकूण १४२.७५ क्विंटल कचरा यावल शहरातून काढला. या स्वच्छता अभियानामुळे श्री सदस्यांच्या अभियानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या