Sunday, April 27, 2025
Homeजळगावडोंगर सांगवी येथे रा.से.योजनेचा उत्साहात समारोप.

डोंगर सांगवी येथे रा.से.योजनेचा उत्साहात समारोप.

डोंगर सांगवी येथे रा.से.योजनेचा उत्साहात समारोप.

यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान यावल महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव डोंगर सांगवी येथे प्र.प्राचार्या डॉ‌. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात समारोप संपन्न झाला यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी.खैरनार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.की राष्ट्रीय स्वयंसेवकांनी हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामार्फत काम करून देशसेवा भाग्य लाभते समाजसेवेबरोबरच स्वतःचा व्यक्तिमत्व विकास व समाजात वेगवेगळ्या विषयामार्फत जनसामान्य माणसापर्यंत जनजागृती करून स्वतःबरोबर समाजाचा आणि गावाचाही विकास झाला पाहिजे श्रमसंस्कार चांगले गुण ओळखून स्वीकारले पाहिजे असे सांगितले.उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी नविन शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन करणे, सध्याच्या आँनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान अवगत झाले पाहिजे एक्सल,पावरपाईंन्ट ह्यासाठी भाषा प्रयोगशाळेचा वापर करावा असे सांगितले
दि ४जानेवारी २०२५ पासून सुरू झाले होते. या श्रम संस्कार शिबिरामार्फत गावातील अनेक कामे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी केली. सकाळच्या सत्रात स्मशानभूमीची साफसफाई, गावातील रस्त्याची झाडझुड, ग्रामपंचायतच्या मंगल कार्यालयासमोरील स्वच्छता, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या परिसरातील स्वच्छता,जि.प.शाळेत समोरील परिसरातील स्वच्छता, हे करत असताना बेटी बचाव बेटी पढाओ,वृक्ष संवर्धन,व्यसनमुक्ती, आरोग्य स्वच्छता,ग्रामस्वच्छता यासंदर्भात रॅली काढून वेगवेगळे पथनाट्य सादर करून जनसामान्य माणसांमध्ये जनजागृती केले.
दुपारच्या बौद्धिक सत्रात वैचारिक प्रबोधन म्हणून व्याख्याने आयोजित केली. त्यात उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मतदान जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी डॉ.जयंत नेहते (विभागीय समन्वयक रा.से.यो.जळगाव ) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व या विषयावर तर डॉ. विजय सोनजे (धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर) यांनी ‘सोशल मीडिया व आजची तरुण पिढी’ यावर तर प्रा. ईश्वर पाटील यांनी ‘सायबर क्राईम’ यावर मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी डॉ. वैशाली निकुंभ ( ग्रामीण रुग्णालय, यावल) यांनी ‘रक्तदानाचे महत्त्व’ तर उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी ‘व्यक्तिमत्त्वाचा विकास’ यावर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या चौथ्या दिवशी श्री मयूर महाजन (सामाजिक कार्यकर्ते राजोरा) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून समाज प्रबोधन यावर तर डॉ. आर डी पवार यांनी ‘ऊर्जा बचत काळाची गरज’यावर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या पाचव्या दिवशी डॉ. सुधा खराटे (सेवानिवृत्त प्राध्यापिका) यांनी महिला सशक्तिकरण यावर तर
प्रा. प्रतिभा रावते यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’यावर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या सहाव्या दिवशी डॉ. दयाघन राणे ( डी. एन. भोळे महाविद्यालय भुसावळ) यांनी से.नो.टु.ड्रग्स यावर तर डॉ. हेमंत भंगाळे यांनी जैवविविधता संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या सातव्या व समारोपाच्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी सहशालेय उपक्रम सादर केले यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. प्रदीप तायडे तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून नंदीनी महाजन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
. यावेळी कार्यक्रमाचा सात दिवसाचा अहवाल कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रल्हाद पावरा यांनी मांडला सूत्रसंचालन कु.तेजश्री कोलते हिने केले. तर आभार प्रा सी टी वसावे यांनी मानले. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली कोष्टी, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ.आर. डी. पवार, डॉ.मयुर सोनवणे,श्री.मनोज कंडारे, प्रमोद जोहरे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या