Thursday, March 27, 2025
Homeजळगावतरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !

तरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !

तरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – निंभोरा गावातील तरुणांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून निंभोरा येथील २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ (ता. चाळीसगाव) येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी निंभोरा येथील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, कल्पेश विकास पाटील (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला निंभोरा गावातीलच काही तरुण मागील भांडणातून सतत छळत होते. त्यामुळे कल्पेश याने आपल्या मावशीच्या गावी तरवाडे पेठ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचे वडील विकास यादव पाटील (निंभोरा) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल पाटील, अनिल पाटील, आशा पाटील, समाधान पाटील, विशाल पाटील, विशाल पोपट पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या