Tuesday, April 29, 2025
Homeजळगावतरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात काम करणाऱ्या तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नाचणखेडे येथे बुधवारी भल्या पहाटे घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,पाचोरा तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात नकला तयार करण्याचे काम करणारा तरुण आकाश रामसिंग पाटील (२९, नाचणखेडे) हा मंगळवारी रात्री जेवण करून झोपला. २५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यास पत्नी झोपेतून उठविण्यास गेली असता तो उठला नाही. त्यास तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यास मागील आठवड्यात डेंग्यूची लागण झाली होती, त्यातून तो सावरला होता. मात्र, आकाश याचा झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट करण्यात आले. एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या