तरुणाला नोकरीचे आमिष देत वडिलांना लाखात लुटले ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत, एका शेतकऱ्याची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील प्रभाकर सोपान जावळे (वय ५५) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा असा परिवार आहे. फिर्यादीनुसार प्रभाकर जावळे यांचा मुलगा कुणाल याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष देत, २०१८ पासून ते आतापर्यंत सतीश दिलीप चौधरी (वय ३२, व्यवसाय व्यापारी) शशिकांत दिलीप चौधरी (वय २९), धर्मराज रमेश खैरनार (वय ३५), सरिता पंढरीनाथ कोळी (वय ४५, गृहिणी, रा. चहार्डी, ता. चोपडा) व पंढरीनाथ भागवत कोळी (वय ५०, रा. चहार्डी, ता. चोपडा) यांनी ऑनलाइन व रोख ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, नोकरी लावून दिली नाही. पैसे दिले नाही.