तरुणीचा फोटो केला व्हायरल : चार जणांविरोधात गुन्हा दाखल !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात चार युवकांनी १९ वर्षीय तरुणीला धमकी दिली. तिचा फोटो एडिट करून समाज माध्यमांवर व्हायरल केला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पहूर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या गावातील तरुणीचा फोटो यश रवींद्र शेळके (२१) नितीन सुनील पाटील (२६), सचिन सुनील सोनवणे (२५) व तनुज पाटील (२२) यांनी धमकी देऊन मिळवला. यात छेडछाड करून तो अश्लील फोटो व्हायरल केला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तरुणांची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत दाते करीत आहेत