Monday, April 28, 2025
Homeगुन्हातलवार व चाकूने वार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक !

तलवार व चाकूने वार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक !

तलवार व चाकूने वार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील देवळी येथील एका प्रौढावर तलवार व चाकूने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एकास अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन असल्याने त्याची अभिरक्षा गृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे, तालुक्यातील देवळी येथील अशोक रघुनाथ गायकवाड (वय ६०) हे ४ जानेवारीला रात्री ११.३० वाजता घरात झोपले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधून घरात मागील दरवाजाने प्रवेश केला. या दोघांनी अशोक गायकवाड यांच्यावर तलवार व चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. यात त्यांच्या डोक्याला अन् दोन्ही गाल व हाताला गंभीर इजा झाली होती. तर अशोक गायकवाड यांना यामुळे त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे. याबाबत जखमी अशोक गायकवाड यांची स्नुषा बेबाबाई चंदर गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात वरिष्ठांच्या सूचनेनुसार स.पो.नि. प्रवीण दातरे, पो.उ.नि. सुहास आव्हाड, विकास शिरोळे तसेच पो.हे. कॉ. गोकूळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पो.कॉ. विनोद बेलदार, संजय लाटे, नीलेश लोहार, भूषण बाविस्कर यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने हा गुन्हा उघडकीस आणला.

या प्रकरणी देवळी येथील सागर राजू गायकवाड (वय २४) यास अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर गुन्हा त्याचा अल्पवयीन लहान भावासह केल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे आरोपीचा लहान भावास ताब्यात घेतल्यानंतर त्याचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु, तो अल्पवयीन असल्याने त्यास जळगावच्या अभिरक्षा गृहात रवाना केले आहे. तसेच या गुन्ह्यातील तलवार व चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या