तिसरे अपत्य असल्याने चिखली ग्रामपंचायत सदस्य अपात्र जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिला आदेश.
यावल दि.९ खानदेश लाईव्ह इंग्लिश प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत सदस्य शेख समद शेख सुलतान खाटीक यास तिसरे अपत्य असल्याची तक्रार चिखली येथील प्रभाकर सोनवणे विजयकुमार काकडे श्रीराम पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली होती त्या तक्रारीची सुनावणी होऊन जिल्हाधिकारी जळगाव यांनी शेख समद यास तिसरे अपत्य असल्याने अपात्र असल्याचा आदेश दि.३१ मार्च २०२५ पारित केल्याने चिखली ग्रामस्थांमध्ये मोठी चळवळ उडाली आहे.