तू माझ्या पत्नीपासून लांब रहा, म्हणाल्याने तरुणाला जबर मारहाण. गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तू माझ्या पत्नीपासून लांब रहा असे बोलल्याचा राग आल्याने गौरव अनिल चौधरी (रा. भाटीया गल्ली, धरणगाव) याने तरुणाला मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोळ्याला व नाकाला मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ रोजी व. वा. वाचनालयाच्या रोडवर घडली होती. याप्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील नवीपेठ राहणारा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २९ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधून घरी पायी जात असतांना शहरातील व. वा. वाचनालयाच्या गल्लीतील रोडवर त्यांनी पत्नी गौरव अनिल चौधरी याच्यासोबत रेल्वेस्टेशनकडून येतांना दिसली. त्यानंतर तरुणाची पत्नी घरी निघून गेल्यानंतर त्या तरुणाने गौरव चौधरी याला रस्त्यात अडवून तु माझ्या पत्नीसोबत काय करतो आहे, तु तिच्या पासून लांब रहा असे बोलला. त्याचा राग आल्याने गौरव याने त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलून तो तरुणाच्या डोळ्याजवळ मारला. यावेळी त्याच्या भुवई जवळ आणि नाकाला दुखापत होवून रक्तस्त्राव होवू लागला.तरुणाला अचानक चक्कर येवू लागल्याने त्याला आपल्या भावाला फोन लावून बोलावून घेतले. त्यांचा भाऊ आल्यानंतर तरुण शहर पोलीसात तक्रार देण्यासाठी गेला, याठिकाणी पोलिसांनी त्याला मेडीकल मेमो देत उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर तरुणाने शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन संशयित गौरव अनिल चौधरी रा. भाटीया गल्ली धरणगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.