तोतया पोलिसांनी पावणेतीन लाखांचे दागिणे लांबवले
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेच्या अंगावरील दोन लाख 65 हजारांची दागिणे तोतया पोलिसांनी लांबवले. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळ घडली. दोघा अनोळखींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपनगरजवळ दोघा अनोळखींनी वसंत जगन्नाथ पाटील (79, रा. वेडीमाता मंदीर, खळवाडी, आदर्शगल्ली, भुसावळ) यांची अॅक्टीवा गाडी थांबवून आप पोलीस असत्याची बतावणी केली. आत्ताच एका म्हातारीचे दागिणे लांबवल्याने तुम्ही इतके दागिणे घालून कोठे जात आहात, असे सांगून दीपनगर बस्टॅन्डसमोरील महामार्गावर दुचाकी थांबवली.अंगावरील सोने काढून ठेवा, असे सांगितल्याने वसंत पाटील यांनी रुमालात दागिणे काढले, सोबत कागदपत्रे सुध्दा रूमालात ठेऊन रुमाल बांधला व रुमाल डिक्कीत नीट ठेवतो, असे सांग, हातचलाखीने दोन लाख 65 हजारांचे दागिणे घेऊन भामटे पसार झाले. वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहेत.