थंडीच्या वातावरणात जळगाव वाळू प्रकरणाचे कायदेशीर चटके बसले ९ पोलिसांना !
कंट्रोलला जमा केल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ.
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अवैध वाळू वाहतूक व्यावसायिकांशी काही पोलिसांचे आर्थिक हितसबंध आहेत अशी एक पोस्ट माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक पेजला टाकली असता पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप ९ पोलिस कर्मचाऱ्यांवर झाला होता आणि याची चौकशीसाठी करण्यासठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आल्याने तसेच ऐन थंडीच्या दिवसात वाळूचे चटके नऊ पोलिसांना बसल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे खळबळ उडाली आहे.
जळगाव उपविभागातील ५ पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा संशय आहे.तसेच अवैध वाळू वाहतूक व्यवसायात पोलीस आहेत किंवा नाही या चौकशी संदर्भातले आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी काढलेले आहेत.वाळू व्यावसायिकांशी पोलिस कर्मचाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप होत होते आणि तशी यादी देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.या संपूर्ण घटनेची गंभीर दाखल घेत पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी या सर्वांना मुख्यालयात बदली करण्याचे आदेश काढले आहेत.यात जळगाव एमआयडीसी,तालुका,शनिपेठ, रामानंद नगर,जिल्हापेठ,एलसीबी व शहर पोलिस ठाणे अशा अनेक पोलिस ठाण्यातील नऊ जणांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आले आहे. त्यांची उचलबांगडी झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.पिंप्राळा येथील हुडको परिसरात एका तरुणाचा खून झाला होता आणि यात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.या तरूणाचा प्रेमविवाहातून झालेल्या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांना एक पोलिस मदत करीत आहे असा आरोप नातेवाईंकडून करण्यात आला होता.त्या विषयी देखील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना दिले आहे.या घटनेची चौकशी करून अहवाल मागविला आहे आणि चौकशी अहवालात काही तथ्य आढळले तर संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ,चोपडा,यावल,रावेर, मुक्ताईनगर,बोदवड व इतर अनेक ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डंपर, ट्रॅक्टर, ४०७ इत्यादी मालवाहतूक वाहनांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना कोणाकोणाचे आशीर्वाद आहेत आणि या अवैध वाळू वाहतुकीत कोणकोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहेत आणि अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडल्यानंतर कोणकोणते लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून दंडात्मक कारवाई कमी करा असा दबाव आणि प्रभाव टाकीत असल्याचे आणि अवैध वाळू प्रकरणात कोण कोण मासिक हप्ते वसूल करतो याबाबत अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.अवैध वाळू वाहतुकीत संबंधित यंत्रणेच्या संपर्कात दैनंदिन रात्रंदिवस कोण कोण सहभागी आहेत यांचे भ्रमणध्वनीवरील कॉल ची माहिती काढल्यास सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.