Sunday, April 27, 2025
Homeजळगावथरारक घटना : सिलिंडरचा स्फोट झाल्याने सात ते आठ घरे जळून खाक...

थरारक घटना : सिलिंडरचा स्फोट झाल्याने सात ते आठ घरे जळून खाक !

थरारक घटना : सिलिंडरचा स्फोट झाल्याने सात ते आठ घरे जळून खाक !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एका खळ्याला अचानक आग लागून त्यात एका घरातील चार ते पाच सिलिंडरचा स्फोट होऊन सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची थरारक घटना तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री घडली. त्यातच परिसरातील वादळामुळे आग अधिकच पसरत गेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरून गेले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. आगीने या घरालाही आपल्या कवेत घेतले. त्यामुळे एकापाठोपाठ एक करून सिलिंडरचा स्फोट झाला.
स्फोटानंतर गावात भीषण आग लागल्याने अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहोचली. काही वेळाने धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी घटनेचा आढावा घेतला. या गावाला जाण्यासाठी तापी नदीतूनच रस्ता आहे. अमळनेरहून निघालेले अग्निशमन दलाचे वाहन या नदीपात्रातील वाळूत रुतले. शेवटी जेसीबी लावून हे वाहन बाहेर काढावे लागले. त्यानंतर ते सात्री गावात पोहचले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या