थोरगव्हाण येथे नाथ षष्टी निमित्त माधवनाथ मंदिरात रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न
माधवनाथ महाराज शिष्य मंडळींचा उत्सुर्त प्रतिसाद
सावदा प्रतिनिधी – आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी श्री माधवनाथ महाराज मंदिर थोरगव्हान ता रावेर येथे नाथ षष्ठी निमित्ताने श्री दत्तांच्या पादुकांचा रुद्राभिषेक डोंबिवली स्थित नाथ शिष्य श्री चंद्रकांत जनार्दन पाटील व सौ.मनीषा चंद्रकांत पाटील या दोघांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले आहे.
परिसरातील पंचक्रोशीतील समस्त नाथ शिष्यांच्या समवेत मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात आज सकाळी हा सोहळा पार पडला. त्यावेळी परिसरातून रावेर ,जळगाव, भुसावळ व थोरगव्हाण येथील बरीचशी नाथशिष्य मंडळी भाविक मंडळी दर्शनासाठी आली होती. त्याप्रसंगी गावातील व परिसरातील नाथशिष्य व भाविक गण यांच्या साठी इंदूरस्थित नाथशिष्य रोहित अशोक कोल्हे व सौ प्रचिती रोहित कोल्हे यांचे तर्फे महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.
श्री माधवनाथ सेवा संघ थोरगव्हाण चे समस्त कार्यकर्ते व परिसरातील सर्व भक्त उपस्थित होते सर्व भक्तांना माधवनाथ सेवा संघ थोरगव्हाण तर्फे टी-शर्ट वाटप करण्यात आले. संपूर्ण नियोजन कामी नाथभक्त श्री उमाकांत लोणे यांनी मेहनत घेतली आहे.
या कार्यक्रमाला माधवनाथ सेवा संघाचे सचिव श्री वामन लक्ष्मण चौधरी, प्रशांत चौधरी निलेश चौधरी पंढरीनाथ तेजनकर यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे पौरहीत्य श्री उदय दीक्षित व त्यांचे सहकारी मंडळ यांनी पार पाडले होते.माधव नाथ महाराज यांचे बाहेर गावचेही भक्त सुद्धा या कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होतात .