दत्त मंदिरात हुतात्मा बापूराव वाणी यांची ५१ ना वी पुण्यतिथी साजरी.
यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दि.१ जानेवारी २०२५ रोजी यावल येथील दत्त मंदिरात हुतात्मा बापूराव वाणी यांची ५१ ना वी पुण्यतिथी भारतीय जनता पार्टीचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी साजरी केली.
भुसावळ येथील सुनील नेवे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा बापूराव वाणी यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे किशोर कुलकर्णी वसंतराव भोसले यांनी केले.
दादा वाणी यांनी प्रास्ताविक भाषणातून बापू वाणी यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकून अनेक महत्त्वांच्या गोष्टी सांगितल्या व त्यानंतर त्यांनी बापू यांच्या जीवनावर आधारित एक समर्पित गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
जयंती कार्यक्रमात वसंतराव भोसले, किशोर कुलकर्णी,गोपाल सिंग राजपूत,अंबादास वाणी चंद्रकांत नेवे,डॉ.योगेश गडे,मुकुंदा भार्गव.संजय नेवे,अजय भालेराव, नरेंद्र नेवे,रमणलाल गर्गे,भास्कर बुधो तायडे,किरण बाळकृष्ण नेवे, सतीश भाऊलाल नेवे, पुंडलिक बारी,सौ.आशाताई अंबादास वाणी, मंदाकिनी ठाणावाला,नलिनीताई नंदकिशोर नेवे.सौ.नीलिमा अजय नेवे. इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.