दहिगाव येथील तरुणाची विहिरीत उडीमारून आत्महत्या.
यावल दि.२५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील एका २३ वर्षीय तरुणाने दि. १४ मार्च २०२५ रोजी धुलीवंदनाच्या दिवशी रोजी गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताने आत्महत्या का व कशी केली याबाबत दहिगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. दहिगाव येथील दत्त नगरातील सोमानंद उर्फ सोनू कमलाकर पाटील वय २३ याने दि.१४ मार्च रोजी दुपारी ३ तीस वाजेचे सुमारास गावालगत असलेल्या शेत गट नंबर २२८/ १ या किरण मधुकर नेते यांचे शेतातील विहिरीत पुढे घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह १५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजेचे सुमारास काढण्यात आला विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने मृतदेह अनेकांना मिळून आला नाही मात्र मारूळ येथील मुस्लिम समाजाच्या वयोवृद्धाने हा मृतदेह शोधून काढला.त्याच्यावर तुषार सोनकी यांनी शवविच्छेदन केले.तब्बल २० तासानंतर हा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. मयताचे पश्चात आई-वडील,बहिण, काका, काकू, असा परिवार आहे मैताने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या का केली..? याचे कारण गुलदस्त्यात असले तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ. नरेंद्र वाघुळडे करीत आहेत.