दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेचा पाल क्षेत्रात दिक्षांत सोहळा
पाल, ता. २० : वन्य जिव व वन संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार (ता १९ ) पाल येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील प्रशिक्षणार्थीचा दिक्षांत सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
पाल येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत सत्राचा दिक्षांत सोहळा व प्रमाणपत्र वितरण समारंभचा कार्यक्रम सपंन्न झाला.या प्रशिक्षण सत्राकरीता नागपुर , चंद्रपूर, गडचिरोली, वन्यजीव विभागाचे व प्रादेशिक विभागाचे एकुण ५७ प्रशिक्षणार्थीचां समावेश होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषिकेश रंजनअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)
नाशिक, आणि प्रमुखअतिथी म्हणून नीनु सोमराज भा.व.से. वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे, उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक यांनी वन हक्क कायदा विषयी माहिती प्रशिक्षणार्थीनां समजाऊन सांगीतली अध्यक्षीय संभाषणात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांनी वन व वन्यजीव यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण वन व वन्यजीव यांचे रक्षण करावे याविषयी लोकांमध्ये जनजागृती करावी असे मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच अहवाल एच. वाय. शेवाळे ( संचालक दादासाहेब वन प्रशिक्षण संस्था) यांनी सादर केले. सदर प्रशिक्षण काळात प्रात्यक्षिक प्रशिक्षणांतर्गत ९ जून ते २५ जून या कालावधीत विदर्भातील वन्यजीव व्यवस्थापन वनसंरक्षण कार्य योजने नुसार होणाऱ्या कामाचा अभ्यास करण्या करिता क्षेत्रीय अभ्यास दौरा करण्यात आला. यावेळी अल्लापल्ली वन विभाग, ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंधारी, त्यांचे व्याघ्र प्रकल्प नागपूर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यात आली. तसेच २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये दौलताबाद इको बटालियन रोपवन, संयुक्त व्यवस्थापन समिती अंतर्गत शिवनेरी गड किल्ल्यांचे अभ्यास, तबक उद्यान, फुलपाखरू उद्यान, कागल रोपवाटिका राहुरी ,दापोली कृषी विद्यापीठ विविध प्रकल्प यांचा अभ्यास करून संजय गांधी नॅशनल उद्यान बोरीवली येथील निसर्ग पर्यटना विषयी माहिती देण्यात आली. यावेळी अजय बावणे ( वनक्षेत्रपाल रावेर प्रादेशिक) , श्री कासार, श्रीमती हजरा तडवी (सरपंच पाल) ,अर्जुन जाधव (माजी सरपंच पाल ), युनूस तडवी, सलीम तडवी, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.