Sunday, April 27, 2025
Homeगुन्हादारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी केली बापलेकाला जबर मारहाण !

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी केली बापलेकाला जबर मारहाण !

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी केली बापलेकाला जबर मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोन अनोळखी इसमांनी बापलेकाला बेदम मारहाण केली. यावेळी त्यातील एकाने दगडफेकून मारल्याने प्रौढ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १५ रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळील नवजीवन सुपरशॉपजवळ घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध जिल्हापेठपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील गुड्डू राजा नगरात संकेत किरण बाविस्कर हा तरुण राहत असून तो पुणे येथे नोकरीस आहे. दि. १४ रोजी पुण्याहून जळगावला येण्यासाठी निघाला. पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास तो मानराज पार्क येथे उतरला. त्याने वडीलांना कॉल करुन त्याला घेण्यासाठी बोलावले. रस्ता ओलांडून तो नवजीवन सुपर शॉपच्या दिशेने जात असतांना त्याच्या मागून एक जण जवळ आला. त्याने मला २०० रुपये दे तुला सकाळी परत करतो असे म्हणाला, त्यावर संकेत याने माझ्याकडे पैसे नाही, त्यावेळी पुन्हा एक जण त्याच्याजवळ आला. त्याने पैसे देवून टाक असे बोलू लागला. तसेच आम्हाला दारु पिण्यासाठी पैसे दे असे म्हणू लागला.त्याचवेळी तरुणाचे वडील त्याठिकाणी आले, त्यांनी देखील त्या दोघ इसमांना पैसे नसल्याचे सांगितले. त्या गोष्टीचा त्यांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने कमरेच्या बेल्टने तर तर दुसरा चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत होता.

मारहाणीत एकाने नखाने संकेत बाविस्कर याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर दुखापत केली. तर त्याला सोडवित असतांना त्यांना दुसऱ्या दगड मारुन फेकला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, त्या दोघांनी तुम्ही जर पोलीसात तक्रार केली तर आम्ही तुम्हाला बघून घेवून अशी धमकी दिली. दरम्यान, बाविस्कर यांनी शनिवारी लागलीच जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या