Wednesday, March 26, 2025
Homeजळगावदिपनगर येथील शारदा विद्यालयात एड्स सप्ताह निमित्त एचआयव्ही विषयी मार्गदर्शन

दिपनगर येथील शारदा विद्यालयात एड्स सप्ताह निमित्त एचआयव्ही विषयी मार्गदर्शन

दिपनगर येथील शारदा विद्यालयात एड्स सप्ताह निमित्त एचआयव्ही विषयी मार्गदर्शन

वरणगाव प्रतिनिधी- खानदेश लाईव्ह न्युज जागतिक एड्स दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील शारदा विद्यालयांमध्ये वरणगाव ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्स विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो, आणि एक डिसेंबर पासून जागतिक एड्स सप्ताह सुरू होतो, सप्ताह निमित्त वरणगाव आयसीटीसी विभागाच्या वतीने भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स विषयी मार्गदर्शन करण्यात आले, वरणगाव आयसीटीसी विभागाच्या समुपदेशका ज्योती गुरव यांनी एचआयव्ही एड्स होण्याची कारणे, प्रतिबंध आणि उपाय, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारने कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज,उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्यांवर विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले, उपस्थित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना एचआयव्ही विषयी शपथ देण्यात आली, यावेळी शारदा विद्यालयाचे प्राचार्य जे .बी. पाटील, प्राध्यापिका मोहीनी शिंदे ,हिना पटेल, विहान चे बाह् संपर्क कार्यकर्ते दत्तात्रय गुरव ,एल डब्ल्यू एस विभागाच्या सुनंदा तायडे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या